Advertisement

हिवरसिंग्यात जुगार अड्ड्यावर कारवाई 

प्रजापत्र | Saturday, 19/09/2026
बातमी शेअर करा

शिरूर कासार दि.१९(प्रतिनिधी): तालुक्यातील हिवरसिंगा येथे जुगार अड्यावर शिरूर कासार पोलिसांनी शनिवार (दि.१९) रोजी दुपारी कारवाई केली असून २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करत चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

शिरूर कासार पोलिसांचा अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सपाटा सुरु असून तालुक्यातील हिवरसिंगा येथील महादेवाच्या मंदिरासमोर तिर्र्ट नावाचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळताच शनिवार (दि.१९) रोजी दुपारी २:३० च्या सुमारास कारवाई करत रोख रक्कम,मोबाईल इतर साहित्य असा एकूण २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करत चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे,सपोनि राजेश गडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.अं दादासाहेब उबाळे,श्री.तांदळे यांनी केली.

Advertisement

Advertisement