Advertisement

वीजेच्या खेळखंडोब्यात शेतकर्‍यांचे निघाले दिवाळे

प्रजापत्र | Saturday, 14/11/2020
बातमी शेअर करा

अशोक शिंदे . 

 नेकनूर : मागील चार पाच वर्षपूर्वी  नेकनूर मध्ये असलेले कनिष्ठ अभियंता निर्मळे यांची बदली झाल्यानंतर नेकनूर च्या कार्यालयाला तेव्हापासून घरघर लागली आहे. सध्या कार्यरत असलेल्या अभियंत्याचा थांगपत्ता नसल्याने येथील कार्यालयाचा  दुसर्‍या अभियंत्याकडे अतिरिक्त पदभार असल्याने त्यांचे दर्शन नेकनूरकरांना होत नाही. त्यामुळे नेकनूर सह परिसरातील विजेचा खेळखंडोंबा झाला आहे. वीज गेली तर ती परत केव्हा येईल हे सांगण्यासाठी ही येथील कार्यालयात कोणी हजर नाही. शिवाय वीज बिलेही नागरिकांना मिळत नसल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे. अनेक वेळा या कार्यालयाला कुलुपही ठोकले ,रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होती. विजेचा पुरता खेळखंडोंबा झाल्याणे सना सुदीच्या काळात शेतकर्‍यांवर विघ्न आल्याने  लातोके भूत बातों से  नही मानते रूमण्याशिवाय वटनी येणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे.  

अभियंत्यासोबत नेकनूरमधून वीज अन् बिलेही गायब; शेतकर्‍यांची उडतेयं तारांबळ 
ट्रान्सफर्मारचे कारण पुढे करत सुरू असलेल्या दिवसभर लोडशेडिंगमुळे शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. केवळ विजेअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी वर्ग सध्या चिंतेत आहे झाला आहे. त्यामुळे लवकर विजेचा प्रश्‍न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

 

Advertisement

Advertisement