Advertisement

आपत्तीग्रस्त राज्यांना केंद्राची मदत, महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळासाठी 268 कोटी मंजूर

प्रजापत्र | Friday, 13/11/2020
बातमी शेअर करा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील समितीनं सहा रांज्यासाठी हे पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानासाठी 268.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई पोटी 1 हजार 65 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केली होती. 

महाराष्ट्राला तटपुंजी मदत
महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईसाठी 1 हजार 65 कोटी रुपये मागितले होते. मात्र, महाराषट्राला अवघे 268 कोटी 59 लाख मंजूर करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या सहा राज्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रासोबत, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश, सिक्कीम या राज्यांना देखील मदत करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला तटपुंजी मदत करण्यात आलीय.

राज्य निहाय मदतीची रक्कम
महाराष्ट्र : 268 कोटी 59 लाख
पश्चिम बंगाल: 2,707.77 कोटी
कर्नाटक : 577.84 कोटी
मध्य प्रदेश : 611.61 कोटी
सिक्कीम : 87.84 कोटी

 

Advertisement

Advertisement