Advertisement

पिटीआर असणार्‍या लाभार्थ्यांना मिळणार घरकुल

प्रजापत्र | Thursday, 10/11/2022
बातमी शेअर करा

बीड दि.10(प्रतिनिधी)ः- बीड शहरातील अनेक लाभार्थ्यांना केवळ तांत्रिक अडचणीमुळे घरकुलाचा लाभ घेता येत नव्हता ही बाब निदर्शनास आल्या नंतर युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून ज्यांच्याकडे पिटीआर आहे त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा असा आदेश मंजूर करून घेतला.

 

यानंतर डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून तांत्रिक बाबीची पूर्तता करून अर्जदार लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे अशी मागणी केली त्यानुसार पिटीआर वर नाव नोंदणी असणार्‍यांना घरकुल देण्याचा मार्ग मोकळा झाला असून असे 400 ते 450 लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यामुळे आता या लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारणार आहे.नगर परिषद बीड प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डीपीआर-109-910-989-200 या चार डीपीआर मधील जवळपास 400-450 मंजुर असलेल्या लाभार्थ्यांकडे जागेचा फक्त पिटीआर होता, मात्र काही तांत्रिक बाबीमुळे या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देता येत नव्हता परंतु गेल्या 2 वर्षा पासुन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर आणि युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर हे सातत्याने प्रयत्न करत होते.याबाबत मुख्याधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चे दरम्यान मुख्याधिकारी यांनी सदरील लाभार्थ्यांना लाभ देण्याचे संागीतले त्यामुळे बीड शहरतील पिटीआर वरील सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकला झाला आहे.
 

Advertisement

Advertisement