बीड दि.१० (प्रतिनिधी) - राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय, बीड च्या वतीने डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकीत्सक, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय व रुग्णालयीन परिसरामध्ये कोटपा कायदा 2003 चे उल्लंघन करणाच्या (परिसरामध्ये तंबाखू सेवन करणार्या, सेवन करुन थुंकणार्या, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोबत बाळगणार्या ) 84 लोकांवर कारवाई करुन रु. 7000/- एवढा दंड वसुल करण्यात आला. तसेच रुग्णालयीन परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करुन उपस्थीतांना तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली व आपले जिल्हा रुग्णालय तंबाखू मुक्त व स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी मा. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संतोष शहाणे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक अशोक मते, जिल्हा सल्लागार नागनाथ भडकुंबे, सामाजीक कार्यकर्ता सुरेश दामोधर ,अंबादास जाधव, कार्यक्रम सहाय्यक ऋषिकेश शेळके व इतर अधिकारी कर्मचारी वर्ग आणि व रुग्णांचे नातेवाईक उपस्थीत होते.
बातमी शेअर करा