नेकनूर - नेकनूरमधून जाणार्या अहमदपूर नगर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी असतानाही त्याची साधी दखलही न घेणार्या एचएमपीच्या कामाच्या दर्जाचे वास्तव उघडे पडले आहे.तीन वर्षपासून सुरू असलेल्या या सिमेंट रोडचे काम अद्याप पूर्णपदावर गेले नाही तोपर्यंतच या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वर्षभरातच भेगा पडल्या असून यामुळे अवघ्या काही काळातच हा रस्ता उखडण्याची भीती निर्माण झाली असताना याकडे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहे.
अहमदपूर नगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुबा ते केज या नवीन होणार्या सिमेंट रस्त्याचे काम सुरवाती पासूनच निकृष्ट होत आहे .या रस्त्याचे काम एचएमपी कंपनी निकृष्ट करत असल्याच्या तक्रारी नेकनुरकरांनी लोकप्रतिनिधी , प्रशासनाकडे वारंवार केल्या , प्रसारमाध्यमानी यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले , तरीही कोणीच या कडे लक्ष न दिल्याने कंपनीने राष्ट्रीय महामार्गाचे हे काम अक्षरशः निकृष्ट दर्जाचे करत उरकले असल्याचे या वरून सिद्ध होत आहे.
लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प
एचपीएम कंपनीच्या कामाबद्दल अनेक तक्रारी केल्यानंतर याची लोकप्रतिनिधींनी कसलीही दखल घेतली नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र कोणीही या मुजोरपणाला आळा घालत नसल्याचे चित्र आहे.