Advertisement

आष्टी तालुक्यात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

प्रजापत्र | Friday, 04/11/2022
बातमी शेअर करा

आष्टी दि.४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील पिंपरी शिवारामध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह (दि.३) रोजी आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आष्टी पोलिसांकडून नातेवाईकांचा शोध सुरू आहे. ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे, पो.प्रविण क्षिरसागर, शिवप्रकाश तवले, पो.ना.जाधव आदींनी भेट देऊन पाहणी केली.

 

याबाबत आष्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील पिंपरी शिवारामध्ये गायकवाड वस्तीच्या पाझर तलावाच्या पायथ्याशी अनोळखी इसमाचा मृतदेह गुरुवारी दि.3 नोव्हेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास आढळला असून इमसाचे वय अंदाजे 45 ते 50 असावे त्याची उंची पाच फूट तीन ते चार इंच असावी त्याचा वर्ण काळा सावळा असून, अंगावर पॅन्ट आहे. त्याचे वजन 45 ते 50 किलो असावे आज सकाळी मृतदेह बीड येथे ओळख पटेपर्यंत शितगृहात ठेवण्यासाठी हलविण्यात आले आहे. या वर्णाच्या इसमाबाबत कोणास माहिती असल्यास आष्टी पोलिसांशी 8888865520, 02441282533 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पोलिस प्रविण क्षिरसागर यांनी केले आहे.
 

Advertisement

Advertisement