Advertisement

देवदर्शन करून परतणाऱ्या जामखेडच्या बोरा कुटूंबाचा पोखरीजवळ अपघात

प्रजापत्र | Wednesday, 02/11/2022
बातमी शेअर करा

आष्टी (प्रतिनिधी) - राजस्थान येथुन देवदर्शन करुन जामखेडकडे परतणाऱ्या जामखेड शहरातील प्रसिध्द भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा यांचे चारचाकी वाहन नगर-जामखेड रोडवरील पोखरी जवळ आल्यानंतर कार पुलाच्या खाली गेल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या समवेत असलेले कुटुंबातील तीन जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले आहे.

       जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी म्हणून ओळख असलेले भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा वय 58 वर्षे रा. जामखेड हे काही दिवसांपुर्वीच आपल्या कुटुंबासमवेत राजस्थान या ठिकाणी देवदर्शनाला गेले होते.ते बुधवारी रात्री विमानाने पुणे विमानतळ या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या चारचाकी गाडीने ते सर्वजण त्यांच्या चारचाकी एम. एच.16 ए. टी 8807 या चारचाकी वाहनाने आपल्या कुटुंबासमवेत पुण्याहून पहाटे जामखेड कडे निघाले होते. त्यांची गाडी बुधवार दि 2 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नगर जामखेड रोडवरील पोखरी फाट्याजवळ आली होती. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या पुलावरून अचानक सदर चारचाकी गाडी पलटी होऊन भीषण अपघात झाला. जखमींना तातडीने जामखेड येथील 

समर्थ हॉस्पिटल या ठीकाणी दाखल करण्यात आले.या अपघातात प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे निधन झाले तर त्याच्या गाडीमध्ये आसलेले त्यांची पत्नी रेखा महेंद्र बोरा, वय 52, सुन जागृती भुषण बोरा वय 28,नात (मुलगी) लियाशा भुषण बोरा वय 6 हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल या ठीकाणी दाखल करण्यात आले होते.त्या नंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. तर त्यांचा मुलगा भुषण शांतिलाल बोरा वय 34 हा कीरकोळ जखमी असल्याने उपचार घेऊन सोडण्यात आले आहे. मयत महेंद्र बोरा यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार आसुन सायंकाळी पाच तपनेश्वर अमरधाम या ठीकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत महेंद्र बोरा हे व्यापारी जितेंद्र बोरा यांचे बंधु होते. ते अतिशय मनमिळावू होते. त्यांच्या निधनाने व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement