Advertisement

सहा दिवसांपासून बेपत्ता तरूणाचा अखेर नदीपात्रात आढळला मृतदेह

प्रजापत्र | Tuesday, 01/11/2022
बातमी शेअर करा

आष्टी दि.१ (प्रतिनिधी) - मागील सहा दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा अखेर कडी नदीपात्रात आज मृतदेह आढळून आला. बिभीषण अशोक पवार ( ३७ ) असे मृत तरूणाचे नाव आहे. पाय घसरून नदीत बुडाल्यानंतर पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 

 

 

आष्टी तालुक्यातील चोभानिमगांव येथील बिभीषण अशोक पवार हा मागील बुधवारी कामानिमित्त कडा येथे आला होता. त्यानंतर तो गायब होता. नातेवाईकांनी बिभीषणचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, सहा दिवसानंतर आज सकाळी नदीपात्रातील झाडाझुडपात विभीषणचा मृतदेह आढळून आला. मृताचा भाऊ अमृतने आष्टी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस हवालदार बाबासाहेब राख, पोलिस नाईक संतोष नाईकवाडे आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. 
 

Advertisement

Advertisement