मुंबई-आपल्या पहिल्यावहिल्या अंतिम सामन्यात दिल्लीने २० षटकांत १५६ धावा केल्या आणि चार वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले. दिल्लीच्या संघाची सुरूवात काहीशी खराब झाली होती, पण कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने संघाचा डाव सावरत सन्मानजनक धावसंख्या उभारली. ऋषभ पंतने स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठोकत ५६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी करत संघाला १५० पार मजल मारून दिली.दिल्लीच्या संघाच्या 25 धावांवर तीन गडी बाद झाल्याने हा संघ १५० पर्यंत मजल मारेल असे वाटतं नव्हते.
युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या IPL स्पर्धेचा आज अंतिम सामना दुबईच्या मैदानावर खेळवला जात आहे. इतिहासात पहिल्यांदाच IPLची अंतिम फेरी गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघापुढे आज चार वेळा IPL विजेतेपद मिळालेल्या मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. यंदाच्या हंगामात मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३ सामने झाले आहेत. या तीनही सामन्यात मुंबईने दिल्लीला मात दिली आहे. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.