Advertisement

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 21/10/2022
बातमी शेअर करा

वडवणी दि.२१(प्रतिनिधी):-तालुक्यातील केंडी पिंपरी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या पुनंदगाव तांडा येथील शेतकरी गोविंद काळु राठोड या शेतकऱ्याच्या शेतामधील अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असल्याने हातचे पीक गेल्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवेचनातून शेतकरी गोविंद काळु राठोड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केंडेपिप्री येथे आज सकाळी १० च्या सुमारास घडली.  

 

                     वडवणी तालुक्यातील केंडी पिंपरी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या पुनंदगाव तांडा येथील शेतकरी गोविंद काळु राठोड वय ६० वर्ष रा. पुलनगाव तांडा ता. वडवणी जि. बीड. यांच्या नावे दोन एकर जमिन असुन या शेतीवर बॅंकेकडून पिककर्ज घेतले होते. परंतु शेतामध्ये सोयाबीन, कापूस पिके होती मात्र अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे बॅंकचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतुन शेतकरी गोविंद राठोड यांनी स्वताच्या शेतातील बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि.२१ ऑक्टोबर रोजी सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीसांनी घटनास्थळी दाखल झाले व या घटनेचा पंचनामा करून मृतदेह कुप्पा येथील आरोग्य केंद्रात शेवविच्छेदन करण्यात आले आहे. सदरील या घटनेने पुलनगाव तांडा केंडेंपिंपरी गावात शोककळा पसरली आहे.
 

Advertisement

Advertisement