Advertisement

सततची नापिकी,अतिवृष्टी व जुने कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 19/10/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.19 अॉक्टोंबर – धारुर (Dharur) तालुक्यातील उमरेवाडी येथील एका 45 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सततची नापिकी,अतिवृष्टी व जुने कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने मंगळवारी (दि.18) रात्री मृत्यूला कवटाळल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

सुर्यकांत लक्ष्मण खोत (वय 45) असे आत्महत्या ( Suicide ) केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. उमरेवाडी येथे सुर्यकांत खोत यांचे कुटूंब राहते. त्यांना गावात एक एकर शेती आहे. या शेतातच शेती करुन खोत कुटूंबियांची उपजिविका भागते. मात्र शेतीसाठी सतत कर्जाचा बोजा घेतला जात होता. या कर्जाला कंटाळूनच कुटूंबातील तरुण शेतकरी सुर्यकांत याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मृत शेतकरी सुर्यकांत याच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

 

 

मंगळवारी रात्री गावाजवळच्या रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली. सकाळी घटनेची माहिती कळताच धारुर पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक संतोष भालेराव यांनी घटनास्थळी भेट दिली . घटनेची नोंद धारुर पोलीसांत (Police) करण्याची प्रक्रिया सुरु आहे. धारूर ग्रामिण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृत तरुण शेतकऱ्याचे पार्थिव आणण्यात आले. तरुण शेतकरी सुर्यकांत याच्या आत्महत्येमुळे उमरेवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement