Advertisement

पदवीधरसाठी शिरीष बोराळकरांना औरंगाबादमधून तिकीट

प्रजापत्र | Monday, 09/11/2020
बातमी शेअर करा

बीड-भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना संधी देण्यात आली आहे.यासोबत संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांनाही भाजपने तिकीट दिले आहे. 
                   विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे चार उमेदवारांची नावे सोमवारी जाहीर केले. यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. इथे रमेश पोकळे यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु होती.पोकळे औरंगाबाद मतदार संघातून तगडे उमेदवार मानले जात होते.मात्र भाजपने  बोराळकर यांना तिकीट दिल्याने आता या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement