Advertisement

अवैध वाळु उपसा करणारी बोट जप्त

प्रजापत्र | Monday, 09/11/2020
बातमी शेअर करा

गेवराई : गोदापात्रातून वाळू उपसा होत असल्यांच्या अनेक तक्रारी वाढल्या असतांना या बाबत महसुल प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.  गेल्या दोन दिवसापांसुन संगम जळगाव या ठिकाणी असना-या गोदापात्रात वाळू उपसा करण्यासाठी चक्क बोट टाकली असल्याची माहीती आहे .
    संगम जळगाव , तसेस गोंदी पाथरवाला या दोन्ही गावाच्या मधुन गोदापात्र आहे पलीकडे जालना जिल्हा आणि अलीकडे बीड अश्या दोन सिमा आहेत या गावातून अनाधिकृत वाळू उपसा केला जात होता प्रशासनातील ठराविक लोकांना चिरीमिरी देऊन हा गोरख धंदा सुरू होता आणि आता ऐवढी मजल झाली की गोदापात्रात चक्क बोट टाकण्यात आली आहे या बोटीचा सराव गेल्या दोन दिवसांपुर्वी करण्यात आला होता यांची संपुर्ण माहीती पोलीस व महसुल प्रशासनाला होती आज सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान याठिकाणी पाण्यात वाळू उपसा करण्यासाठी बोट टाकण्यात आली यांची खबर गूप्त बातमीदाराने जिल्हाधीकारी राहूल रेखवार यांना दिली आणि सकाळीच गेवराई महसुलचे कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी गेले यामध्ये एक बोट आदी साहित्य जप्त करण्यात महसुल प्रशासनाला यश आले आहे सदरची कार्यवाही तहसिलदार सचिन खाडे , तलाठी जावेद शेख , जितू लेंडाळ , तलाठी पाढंरे , तलाठी देशमुख , यांनी केली आहे

Advertisement

Advertisement