मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाइममुळे हैराण पालकांसमाेर हेडफोन ही आणखी एक समस्या आहे. त्यामुळे मुलांना कमी एेकू येते. अमेरिकेतील अहवालानुसार, मागील या पिढीत बहिरेपणा अधिक आहे, परंतु याचे कारण कोणत्याही संशाेधनात स्पष्ट नाही. मात्र, हेडफोनचा वाढता वापर हे यामागे एक प्रमुख कारण मानले जातेे.
टोरंटोमधील आजारी मुलांच्या रुग्णालयातील नाक, कान घसातज्ज्ञ डॉक्टर ब्लॅक पेप्सिन म्हणतात, “हेडफोनने किती वेळ, किती मोठा आवाज ऐकला जातो त्यावर कानाचे नुकसान ठरते. पालकांनी मुलाच्या हेडफोन वापरावर लक्ष आणि नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे जितके ते स्क्रीन टाइमवर ठेवतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन डीफनेसचे डॉ. जिम बेट हे हेडफोनची आवाज पातळी माेजण्याबाबत म्हणतात की मूल तुमच्यापासून हाताच्या अंतरावर असेल आणि तुमचे बाेलणे त्याला ऐकू आले तर हेडफोनचा आवाज सुरक्षित आहे. पण तसे नसेल तर ते धोकादायक आहे. ताबडतोब ताे कमी करा किंवा वापर थांबवा. वेबसाइट वायरकटरने ३० कंपन्यांच्या हेडसेटचे विश्लेषण केले. त्यातील निम्म्यांमध्ये आवाजाची पातळीही निश्चित नव्हती. हेडफोनमध्ये आवाजाची तीव्रता कमी करणे शक्य हाेत नाही
हेडफोन्स आणि इयरफोन्सची गुणवत्ता महत्त्वाची आहे, परंतु कोणत्याही हेडफोनमध्ये आवाज कितीही कमी असला तरी त्याची तीव्रता कमी करता येत नाही. जिम बेट शिफारस करताे, हेडफोनचा आवाज त्याच्या क्षमतेच्या ६०% पेक्षा जास्त कधीही सेट करू नका. दीर्घकाळ वापर असेल, तर दर तासाला काही वेळ ब्रेक द्या.
८५ डेसिबल आवाज ८ तासांपेक्षा जास्त एेकणे मुलांसाठी धोकादायक अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थने १९९८ मध्ये तरुणांसाठी हेडफोन सुरक्षा मर्यादा निश्चित केल्या. त्यात ८५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजावर ८ तासांपेक्षा जास्त वेळ हेडफोन, इअरफोनचा वापर धोकादायक मानला. १०८ डेसिबलपेक्षा जास्त आवाज ३ मिनिटांपेक्षा जास्त ऐकू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
तासन्तास हेडफोन वापरल्याने होणाऱ्या समस्या... हेडफोन सलग जास्त तास वापरल्याने चक्कर येऊ शकते. कानात मेण जमा होते, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. मोठ्या आवाजामुळे कानात कायमची अतिसंवेदनशीलतेची समस्या निर्माण हाेऊ शकते.