बीड दि.२९ (प्रतिनिधी)-राज्यात डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक जाहीर होण्याची सर्वांना प्रतीक्षा असतानाच आता या ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान तीन महिने लांबणीवर पडणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यांसंदर्भात आदेश काढले असून या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. यात बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसह राज्यातील तब्बल ७६४९ ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबरपर्यंत संपत आहे. त्यामुळे आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा होती. सर्वांनाच निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा असली तरी राज्य निवडणूक आयोगाने मात्र आणखी तीन महिने तरी ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात असमर्थता दर्शविली आहे. प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यास लागणार विलंब लक्षात घेऊन या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले असून या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहेत.
प्रजापत्र | Thursday, 29/09/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा