दिंद्रुड - दिंद्रुड नजीक असलेल्या पिंपळगाव(ना.) येथे हिटरची टाकी फुटल्याने उकळते पाणी झोपलेल्या महिलेच्या अंगाखाली आले, गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला.
उषा रंजीत सुरवसे ,वय 31 वर्ष (रा.पिंपळगाव (ना.) ता. माजलगाव मयत महिलेचे नाव असून 19 ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास हिटर सुरू करून महिला झोपली होती. रात्री तीन वाजेदरम्यान प्लॅस्टिकची टाकी उकळत्या पाण्यामुळे फुटली व उकळते सर्व पाणी झोपलेल्या महिलेच्या अंगाखाली आल्याने ती गंभीर जखमी झाली. जखमी उषा सुरवसे यांच्यावर आंबेजोगाई येथील स्वाराती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मयत उषा सुरवसे यांच्या पश्चात पती,तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
काळजी घेणे आवश्यक
पाणी तापवण्यासाठी बाजारात प्लास्टिकच्या टाकीत फिटर जोडून विक्री केली जाते. या टाकीची व हिटरची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. हिटर सुरू करण्यापूर्वी वेळेचे भान जपणे ही तितकेच महत्वाचे आहे. अशा घटनांपासून बोध घेणे आवश्यक आहे.