मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १.३० वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महाराष्ट्राशी बोलणार आहेत. दिवाळी बिहार निवडणुकीचे एग्झिट पोल्स, अर्णब गोस्वामींची अटक या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रातली मंदिरं कधी उघडणार असा प्रश्न भाजपा आणि मनसेने वारंवार केला आहे. त्यावरही ते भाष्य करण्याची शक्यता आहे. इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कोरोनानंतरचं शालेय जीवन कसं असू शकतं त्याबाबतही मुख्यमंत्री बोलू शकतात असाही अंदाज आहे. राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध उपक्रमांचं लोकार्पण करणार आहेत.
बातमी शेअर करा