परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ग्रामीण पोलिसांनी कारवाईची मोठी मोहीम उघडत चोरांनी चोरी केलेल्या तेरा मोटर सायकल त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. त्याचबरोबर मुद्देमालासह चार चोरांना ताब्यातही घेतले आहे. पकडलेल्या चोरांकडून आणखी मोटरसायकल हस्तगत होण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
पो.स्टे.परळी ग्रामीणचे प्रभारी श्री मारुती मुंडे यांनी स्वतः जीवाची बाजी लावून मुख्य चोर राहुल जगनाथ फड वय 22 वर्षे रा.धर्मापुरी यांना 500 मीटर शेतातील वस्तीवर धावून झटापट करून पकडले. त्यात प्रभारी स्वतः जखमी झाले परंतु शेवटी चोराच्या मुस्क्या आवळळ्या आहेत. ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल जगनाथ फड नावाचा चोर शेतामध्ये चिंचेच्या झाडाखाली बसलेला आहे. असे माहितीवरून पो.नि.मारुती मुंडे, पोलीस नाईक पुरुषोत्तम शेप, चालक पोलीस जमादार वखरे यांनी शेतात जाऊन आरोपीला पकडले. त्यानंतर मुख्य आरोपी कडून माहिती घेऊन इतर चोर नामे ईश्वर नवनाथ फड (वय 22 वर्षे) आकाश सुभाष फड (वय 21) ज्ञानेश्वर भरत फड (वय 22 वर्षे, सर्व रा.धर्मापुरी) यांना 22:33 वाजता अटक करून त्यांच्याकडून सुरुवातीला 04 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या.
त्यानंतर आम्ही स्वतः प्रभारी मारुती मुंडे व सोबत तपासी अधिकारी पोलीस नाईक पांडुरंग वाले ब. नं.1534, पो. स्टे. चे डीबी पथकाचे प्रमुख जमादार सुंदर केंद्रे ब. नं. 1636, बीट कर्मचारी पुरुषोत्तम सेफ 793, पोलीस जमादार पुरी ब. नं. 474, जमादार बडे ब.नं.1600, पोलीस जमादार वखरे ब. नं.917 यांनी मेहनत घेऊन पुन्हा चोरीच्या 09 मोटरसायक लि एकूण 13 मोटारसायकली अतिशय मेहनतीने चोराकडून जप्त केल्या. अजूनही तपास चालू असून सर्व आरोपी पीसीआर मध्ये आहेत. आणखी चोरीच्या मोटरसायकली उघड होत आहेत. सदर कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.