Advertisement

पुढील 3-4 दिवस मेघगर्जनेसह पाऊस

प्रजापत्र | Wednesday, 21/09/2022
बातमी शेअर करा

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे ट्विट करत हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली.

 

 

औरंगाबादेतही जोरदार हजेरी
गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नदीचे पाणी शेतात शिरल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

 

 

जळगावमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान  
राज्यात काहीसा पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने कापूस, मका ही पिके धोक्यात आली आहे, याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातल्या 7 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत.पावसामुळे काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झाले आहे.तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

 

 

पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव
वर्धा जिल्ह्यातील कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे कापूस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

 

 

गोंदियांत बाईकस्वार गेला वाहून
गोंदिया जिल्ह्यात मंगळवारच्या रात्री 8 वाजेपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्री न्यु लक्ष्मीनगर येथील 21 वर्षीय तरुण पुराच्या पाण्याच्या प्रवाहात बाईकसह वाहून गेला आहे.

 

Advertisement

Advertisement