Advertisement

राजू श्रीवास्तव यांचे निधन

प्रजापत्र | Wednesday, 21/09/2022
बातमी शेअर करा

मुंबई-कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची अखेर जीवन-मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. ब्रेन डेड झाल्याने त्यांचे निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमात होते. बुधवारी पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल 42 दिवस ते कोमात होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

राजू यांच्या हृदयात आढळले होते 100 टक्के ब्लॉकेज
11 ऑगस्ट रोजी राजू यांच्यावर तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 100 टक्के ब्लॉकेज असल्याचे आढळून आले होते. ही परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी राजू यांच्या हृदयात दोन स्टेंट लावले होते. 13 ऑगस्ट रोजी राजू यांचा एमआरआय काढण्यात आला होता. त्यामध्ये त्यांच्या मेंदूची एक नस दबली गेल्याचे समोर आले होते. राजू यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
 

Advertisement

Advertisement