Advertisement

अन डॉक्टरसह जवानाचा शोध घेण्यासाठी तलावात उतरले जिल्हाधिकारी

प्रजापत्र | Monday, 19/09/2022
बातमी शेअर करा

बीड-माजलगाव धरणात पाहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा मागील दोन दिवसांपासून शोध सुरु असून अद्याप त्याचा तपास लागलेला नसतानाच डॉक्टरच्या शोधासाठी आलेल्या एनडीआरएफच्या पथकातील एक जवान देखील बेपत्ता झाला आहे. त्यातच आता या शोध मोहिमेत स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे देखील उतरले असून माजलगाव धरणात उतरून ते स्वतः शोध घेत असल्याची माहिती आहे. 
माजलगाव धरणात पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा मागच्या २ दिवसांपासून शोध लागलेला नाही. सदर डॉक्टर धरणात बुडाल्याची माहिती असली तरी त्यांचे शरीर अद्याप मिळालेले नाही . त्यातच त्यांच्या शोधासाठी एनडीआरएफच्या पथक आल्यानंतर सोमवारी सकाळी या पथकातील एक जवान  देखील बेपत्ता झाला. सोमवारी या शोध मोहिमेदरम्यान स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे देखील शोध पथकात समाविष्ट झाल्याची माहिती असून ते स्वतःच शोध मोहिमेसाठी धरणात उतरले आहेत. 

Advertisement

Advertisement