दिल्ली : मोदी सरकारने आता सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून फास्ट टॅग अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते आणि परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे ज्यामध्ये १ जानेवारी पासून सर्व चार चाकी वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर झालेली आहे, अशा वाहनांसह M आणि N कॅटेगरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे.
केंद्रीय मोटार वाहणं नियम १९८९ नुसार फास्ट टॅग ला १ डिसेंबर २०१७ नंतर खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशन साठी अनिवार्य केले गेले होते. आणि वाहन निर्माता आणि डीलर द्वारे फास्ट टॅग चा पुरवठा केला जात होता. याच बरोबर हे देखील अनिवार्य करण्यात आले होते, कि फिटनेस प्रमाणपत्राचे रिन्यूअल केवळ ट्रान्सपोर्ट वाहनांवर फास्ट टॅग लावल्यानंतरच केले जाईल. नॅशनल परमिट वाहनांसाठी फास्ट टॅग लावणे १ ऑक्टोबर २०१९ पासून बंधनकारक करण्यात आले होते.
प्रजापत्र | Sunday, 08/11/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा