Advertisement

पिकअप - कारचा अपघात

प्रजापत्र | Saturday, 17/09/2022
बातमी शेअर करा

केज दि.१७ – केज-अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव जवळ मारुती ओमीनी इको आणि पिक-अपच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु झाला तर एकजण जखमी झाला आहे.

 

 

               अधिक माहिती अशी की, शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वा च्या दरम्यान केज अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव जवळ अंबाजोगाई कडून केजकडे येणारे पिक-अप क्र. (एम एच-४३/ए डी-७२१०)चे टायर फुटल्याने ड्रायव्हरचा ताबा सुटुन समोरून केज कडून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या मारुती ओमिनी इको क्र. (एम एच-१३/सी के-२६१४) या गाडीला धडक लागली. यात ओमीनी इको मधील कपड्याचे व्यापारी महेश अंबादास पेटलपट्टी २७ रा. सोलापूर यांचा मृत्यू  झाला तर व्यंकटेश भुपेंद्र इंगे ४७ रा. सोलापूर हे गंभीर जखमी झाले आहेत.

 

           अपघाताची माहिती मिळताच अपघातातील जखमींना नागरिकांनी रुग्णवाहिकेतून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल केले. युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या सूचनेनुसार पोलीस नाईक संपत शेंडगे हे अपघातस्थळी दाखल होत पुढील कारवाई केली.
 

Advertisement

Advertisement