Advertisement

किसान सभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रजापत्र | Friday, 16/09/2022
बातमी शेअर करा

बीड - ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने महिनाभर दडी मारली होती. त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. शासनाने फक्त 46 मंडळांसाठीच 25 टक्के विम्याचा लाभ दिला. मात्र इतर शेतकर्‍यांना लाभ मिळत नसल्याने सर्वांनाच 25 टक्क्याचा लाभ द्यावा या मागणीसाठी आज किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

 

बीड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात फक्त 27 दिवस पाऊस पडला. पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाचे बर्‍याच प्रमाणात नुकसान झाले. विमा कंपनीने 46 मंडळांसाठी 25 टक्के अग्रीम मंजूर केला. हा निर्णय इतर शेतकर्‍यांसाठी अन्यायकारक आहे. नुकसान सर्वच शेतकर्‍यांचे झाले, निर्णय फक्त 46 मंडळांसाठीच का? सर्वच शेतकर्‍यांना 25 टक्क्याचा लाभ द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघाला होता. या मोर्चात शेकडो शेतकर्‍यांंचा सहभाग होता.

Advertisement

Advertisement