Advertisement

रुग्णालयाच्या ब्लड स्टोरेज रूमला लागली आग!

प्रजापत्र | Wednesday, 14/09/2022
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी )-उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी खोलीत असलेल्या कुलरला अचानक आग लागली. आगीमुळे प्रचंड प्रमाणात धूर झाल्याने आसपासच्या खोलीतील रुग्णांना दुसऱ्या खोलीत हलवावे लागले.

 

 

गुरुवारी सायंकाळी अचानक उपजिल्हा रुग्णालयात आग लागली. सदरील आग विजेच्या सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्याचे कळताच नगर पालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली आहे. आग थोडी आणि वायरिंगचा धूर जास्त असल्यामुळे तणावग्रस्त स्थिती झाली होती. मात्र वेळेत आग विझावल्याने होणारा अनर्थ टळला आहे.
 

Advertisement

Advertisement