बीड - तालुक्यातील चौसाळा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या गुटख्याच्या साठ्यावर विशेष पथकाने छापा मारला. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कारवाईत एकास ताब्यात घेण्यात आले. तर 4 लाख 47 हजार 348 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक दररोज कुठेना कुठे छापेमारी करत असे व्यवसाय करणार्याविरूध्द गुन्हे दाखल करत कायदेशीर कारवाई करत आहेत. चौसाळा येथील जैननगर भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये गुटखा साठा करून ठेवल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली. त्यानंतर पथकाने सदरील ठिकाणी छापा मारला असता तेथे अवैधरित्या साठा करून ठेवलेला 4 लाख 47 हजार 348 रूपये किंमतीचा गुटखा आढळून आला. या कारवाईत आरोपी प्रशांत उर्फ बबलू रेबननाथ शिंदे (रा.जैन नगर चौसाळा, ता.बीड) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 328,188,272, 273 प्रमाणे नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनि.विलास हजारे, पोलीस नाईक शिवदास घोलप, पोलीस नाईक विकास काकडे, पोलीस अमलदार किशोर गोरे, पोलीस अमलदार विनायक कडू, पोलीस अमलदार बालाजी बास्टेवाड वाड, चालक पोलिस अमलदार गणपत पवार यांनी केली.