पाटणा-बिहार विधानसभा निवडणूकीसाठीच्यामतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी संपला. मतदानोत्तर चाचणीत ( Bihar Exit Poll) बिहारमधल्या मतदारांचा कल स्पष्ट झाला. मतदानानंतरचे पहिले कल हळूहळू समोर येत आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विविध एक्झिट पोलचा एकत्रित अंदाज पहिला तर आरजेडी – काँग्रेसला 122 तर भाजप-जेडीयूला 112 तसेच इतरला 09 जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होते.राष्ट्रीय जनता दल (RJD) चे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत पक्षाची संपूर्ण धुरा त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर होती. राजद, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष या महाआघाडीकडून मुख्यमंत्रिपदासाठीही तेजस्वी यादव यांचाच चेहरा पुढे करण्यात आला. निवडणुकीच्या पूर्वी सर्व राजकीय विश्लेषक आणि निरीक्षक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करत होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली आणि नवख्या तेजस्वी यादव यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला.बिहारमधील बहुतांश तरुण हे पोटाची खळगी भरण्यासाठी इतर राज्यांमध्ये जातात. मात्र लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवहार ठप्प पडल्याने या असंघटीत कामगारांचा रोजगार गेला आणि नाईलाजाने त्यांना पुन्हा घरची वाट धरावी लागली. त्यातच बिहारमध्ये निवडणुकांची घोषणा झाली. लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावलेला...परिणामी मोठं आर्थिक संकट ओढावलेलं...अशा कात्रीत बिहारी तरुण सापडलेला असतानाच तेजस्वी यादव यांनी एक घोषणा केली आणि संपूर्ण निवडणुकीचं वातावरणच बदलून गेलं.दरम्यान १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
रिपब्लिकचा अंदाज
एकूण जागा – 243 जागा
आरजेडी – काँग्रेस – 91 ते 117
बीजेपी – जेडीयू -118 ते 138
इतर – 5 ते 12
टीव्ही 9 चा अंदाज
एकूण जागा – 243 जागा
आरजेडी – काँग्रेस – 115 ते 125
बीजेपी – जेडीयू – 110 ते 120
इतर – 15 ते 20
C Voter चा अंदाज
एकूण जागा – 243
आरजेडी-काँग्रेस – 120
बीजेपी-जेडीयू – 116
इतर – 07