उस्मानाबाद जिल्हयातील तेर (तगर) उस्मानाबाद (नागेशनगरी) सावरगांव (नागेश सावरगांव), तिर्थ (बु.), उमरगा, खरोसा, लोहारा, कज्हाळी, सिध्देश्वर वडगांव, बेंबळी, पळसप, तुळजापूर, उस्मानाबाद येथील बौध्द व जौन लेण्या असा बौध्द वारसा सांगणारे अनेक स्थळे उस्मानाबाद जिल्हयात आहेत.
पुज्य भन्ते सुमेध नागसेन हे नाव उस्मानाबाद, लातूर जिल्हयातच नव्हे मराठवाडयामध्ये सर्व उपासकांच्या तोंडी झालेल आहे. गेल्या काही वर्षामध्ये भन्ते सुमेध नागसेन यांच्या प्रयत्नातून लातूर जिल्हयातील खरोसा येथे बुध्दविहार उभारले गेले आहे. खरोसा लेण्याच्या जवळच, निसर्गरम्य परिसरात टेकडीवर विहार उभारला गेला आहे. भन्ते सुमेध नागसेन यांच्याच प्रयत्नातून उस्मानाबाद शहरापासून हातलाई रोडने, 15 कि.मी. अंतरावर व गडदेवधरी पाठीपासून सात ते आठ कि.मी. अंतरावर तगर भूमी जेतवन बुध्दीविहाराची निर्मिती होत आहे.
त्यामुळे गडदेवधरी व उस्मानाबाद परिसर पुन्हा एकदा बुध्दधम्ममय होणार आहे. कधी काळी उस्मानाबाद शहराच्या आसपास बौध्द संस्कृती फार मोठया प्रमाणात नांदली होती. याचा प्रत्यय परिसरातील अनेक वस्तू पाहिल्यानंतर येतो. तेर परिसरात तर अनेक वास्तू आपल्या बौध्द संस्कृतीची ओळख देत बौध्द संस्कृतीचा वारसा सांगत शेकडो वर्ष उभ्या आहेत. तेरचे त्रिविक्रम मंदिर पूर्वाश्रमेचे चौत्यस्तुप आहे. बसस्थानकाच्या बाजूस सापडलेले बौध्दस्तुप अशा अनेक ज्ञात, अज्ञात वास्तू तेर परिसरात आजही पहावयास मिळतात.
ज्या बौध्द संस्कृतीचा वारसा सांगतात. भन्ते सुमेध नागसेन यांना वाटते की, उस्मानाबाद, लातूर एवढेच नव्हे तर मराठवाडा परिसरातील बुध्द संस्कृती पुन्हा एकदा गतीमान व्हावी. पुन्हा या परिसरात बौध्दधम्मास वौभवाचे दिवस यावेत यासाठीच गडदेवधरी परिसरात तगर भूमी जेतवन बुध्दविहार उभारण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे. उपासक व उपासिकावरती, बालकांवरती बौध्द संस्कृतीचे संस्कार घडविण्यासाठी विहारांची नितांत गरज असते. त्यामुळेच संस्कारशिल समाज घडवला जावू शकतो.
जेतवन बुध्द विहाराच्या भूमीपूजनाच्या वेळी, भन्ते सुमेध नागसेन म्हणाले होते की, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे व धम्माचे कार्य भरपूर करावयाचे आहे. त्यासाठी लवकरात लवकर विहाराची उभारणी झाली पाहिजे. कधी काळी बौध्द विहारे म्हणजे ज्ञानाची विद्यालयेच होती. नालंदा, तक्षशिला यासारखी केंद्रे ज्ञानाचे संस्कार करणारे, विद्यापीठेच होती. त्यामुळे प्रबुध्द असा समाज निर्माण हात होता.
उस्मानाबादसारख्या प्राचीन, बौध्द वारसा असलेल्या शहराच्या जवळच तगर भुमी जेतवन बुध्दविहार, गडदेवधरी परिसर या नावाने उंच डोंगर माथ्यावर निसर्गरम्य परिसरात विहार उभारला जात आहे हे कार्य पूर्णत्वास गेल्यास, उपासक, उपासिकांना महत्त्वपूर्ण विहार पहावयाला मिळणार आहे व पुन्हा एकदा बुध्दधम्म, बुध्दसंघाचे मंगलमय ध्वनी या परिसरात ऐकायला मिळणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोंबर 1956 ला आपणांस बौध्द धम्माची दिक्षा दिली. त्यानंतर समाजात बौध्द धम्मामुळे एक नवी उर्जा, एक नवी चेतना निर्माण झाली आहे. त्यामुळे जेथे-जेथे बुध्द विहारे उभी केली जात आहेत. त्या-त्या ठिकाणी समाजातील सर्व उपासकांनी तन, मन, धनाने विहार निर्मितीच्या कार्यास हातभार लावला पाहिजे. ही उभी राहणारी विहारे म्हणजे सर्वच समाजाचे दिपस्तंभ आहेत व पुज्यभन्ते म्हणजे धम्माची चालती बोलती विद्यापीठे आहेत.
भन्ते पयानंद थेरो हे मुरुड-अकोला येथील रामेगाव पाटीजवळ बुध्दविहार उभारणी करीत आहेत. भन्ते महाविरो थेरो हे धम्माचा प्रचार व प्रसार करत आहेत. भन्ते सुमेध नागसेन बुध्दविहार निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. या परिसरात बुध्दधम्म, गतीमान व्हावा, जास्तीत जास्त जनता बुध्दम्माकडे तत्त्वज्ञानाकडे वळत आहेत.
बुध्दविहाराच्या माध्यमातून संस्कारशिल भारतीय समाज निर्माण व्हावा, उपासक व उपासिका, बालके यांनी त्रिशरण, पंचशील आष्टांगीक मार्ग, दहा पार्मिता याचे पालन करावे यासाठी भन्ते प्रयत्न करत आहेत. कधीकाळी या परिसरात ओळख असलेला बौध्द धम्म सुमेध नागसेन गडदेवधरी परिसरात उभारत असलेल्या तगर भूमी जेतवन बुध्दविहारामुळे हा परिसर पुन्हा एकदा बौध्दमय होत आहे. पुन्हा या परिसरात धम्माचे मंगलमय ध्वनी या परिसरात ऐकायला मिळणार आहेत. अशा या तगरभूमी जेतवन बुध्दविहार गडदेवधरी परिसरास प्रत्येक उपासकांनी भेट दिलीच पाहिजे, ती आजच, आत्ताच, या क्षणी दिली पाहिजे, उद्या फार उशिर झालेला असेल.
विजय गायकवाड
एम.ए.,बी.एड्. जी.डी.सी. अँड ए.
एच.डी.सी.एम., डी.जे.
शाहू नगर, काकडे प्लॉट उस्मानाबाद
मो.नं. 7709321612