बीड : बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांची राज्यातील २८८ नगरपालिकांच्या व नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार आता राज्यातील नगरपालिकांची 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव , धारूर आणि गेवराई या नगरपरिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या असून त्यासाठी आज राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी या निवडणुका होणार आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना :
अर्ज भरणे : 10 ते 17 नोव्हेंबर
छाननी     :18 नोव्हेंबर
माघार     : 21 नोव्हेंबर
चिन्ह वाटप : 26 नोव्हेंबर
मतदान     :2 डिसेंबर
मतमोजणी : 3 डिसेंबर
	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              
