Advertisement

पाचेगावात चोरट्यांचा धुमाकूळ

प्रजापत्र | Thursday, 08/09/2022
बातमी शेअर करा

गेवराई - पाऊस सुरू असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील पाचेगाव येथील व्यावसायिकांच्या दुकानांना टार्गेट करत दुकानाचे शटर उचकून लाखो रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. रात्री चोरट्यांनी तीन मेडिकल, एक अ‍ॅग्रो एजन्सी आणि एका सोन्याच्या दुकानावर डल्ला मारला.

 

याबाबत अधिक असे की, जिल्ह्यात रात्री सर्वदूर जोरदार पाऊस सुरू होता. या पावसाची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील पाचेगाव येथील बाबूराव गाडे यांच्या मालकीचे माऊली अ‍ॅग्रो हे बियाणांचे दुकान फोडून दुकानातील गल्ल्यातील हजारोची रक्कम चोरून नेली. डॉ. फुलझळके यांचे फुलझळके मेडिकल, डॉ. रोहीत राठोड यांचे देवा मेडिकल, ज्ञानेश्‍वर चव्हाण यांचे माऊली मेडिकल तर गणेश दहिवाळ यांचे दहिवाळ सुवर्णकार दुकान फोडून दुकानामधील लाखो रुपये चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज असून या प्रकरणी तक्रार देण्यासाठी दुकान मालक गेवराई पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत. घटनेची माहिती कळताच गेवराई पोलीस ठाण्याचे बीट अमलदार ए.बी. शेळके घटनास्थळी गेले आहेत. या चोरीच्या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

Advertisement