Advertisement

३० वर्षीय युवक शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 07/09/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि. 7 सप्टेंबर – धारुर तालूक्यात पिंपरवाडा येथील बाबासाहेब विठ्ठल तिडके (वय 30 वर्ष) यांची नापीक जमीन व कर्जास कंटाळून राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

 

 

धारुर (Dharur) तालूक्यातील पिंपरवाडा येथील मुकबधीर असताना शेती करून उदरनिर्वाह करणारा बाबासाहेब विठ्ठल तिडके (वय 30 वर्ष) यांने नापीक जमीनीत उत्पादन होत नसल्याने व कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन मंगळवारी सांयकाळचे वेळी राहते घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला (Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल काथवटे हे करत आहेत.
( Youth farmer suicide in Dharur taluka. )

Advertisement

Advertisement