Advertisement

भर रस्त्यावरील दोन दुकानी फोडल्या

प्रजापत्र | Wednesday, 07/09/2022
बातमी शेअर करा

माजलगाव - शहरातील भर रस्त्यावर असणार्‍या कापड दुकान व जनरल स्टोअर दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दोन्ही दुकानातील 90 हजार रुपये लंपास केले.ही घटना गुरुवार दि.7 रोजी पहाटेच्या दरम्यान घडली आहे.

 

 

शहरातील बीड रोड या ठिकाणी प्रतीक्षा जनरल स्टोअर,लेडीज गिफ्ट हाऊस एम्पोरियमचे व आळने क्लॉथ सेंटरचे दुकान आहे.बुधवारी दिवसभर व्यावसाय करून दुकान मालक दुकान बंद करून 10 वाजन्याच्या दरम्यान घरी जातात.

 

 

गुरुवारी सकाळी नऊ वाजता दरम्यान दोन्ही दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आले. त्यावेळी दुकानच्या शटरचे कुलूप तोडलेले दिसून आले.याबाबत पोलिसांना माहिती देऊन पोलिसांसह आतमध्ये पाहणी केली.त्यावेळी दुकानातील सामानाची नासधूस व प्रतीक्षा जनरल स्टोअर या दुकानातील गल्ल्यामध्ये असणारे 51 हजार रुपये लंपास झाल्याचे निदर्शनास आले. तर आळने क्लॉथ सेंटरच्या गल्ल्यामधील 30 हजार रुपये काढून नेले.दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपासले.पहाटे 1 वाजून 24 मिनिटांनी कोणीतरी एक अज्ञात व्यक्ती शटरचे कुलूप तोडत असल्याचे दिसत होती.दुकान मालक भागवत श्रीमंतराव आबूज रवी आळणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पुढील तपास पो.ना.गणेश तळेकर हे करत आहेत.

Advertisement

Advertisement