Advertisement

पाणी आणण्यास गेलेल्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यु

प्रजापत्र | Wednesday, 07/09/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.7 सप्टेंबर – धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील कासारी ता. केज येथील धनश्री अंकूश डोईफोडे (वय 18 वर्ष) हि मुलगी पाणी आणण्यास विहिरीवर गेली असता पाय घसरून विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी धारूर (Dharur) पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

 

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार केज तालुक्यातील कासारी येथील धनश्री अंकूश डोईफोडे (वय 18 वर्ष) हि मंगळवारी सांयकाळी पाचच्या सुमारास पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती. यावेळी पाय घसरून ती विहिरीत पडली. पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता सदर बाब लक्षात आली. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला (Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी पोलीस नाईक चके पुढील तपास करत आहेत.
 

Advertisement

Advertisement