किल्लेधारूर दि.3 सप्टेंबर – धारुर शहरात पंकज कुमावत यांच्या पथकाची अवैध धंद्यावर कारवाई बडगा उगारला आहे. शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी पथकाने थेट कारवाई करुन आठ आरोपीना बेड्या घालून लाखोंचा ऐवज जप्त केला.
( Action by Pankaj Kumawat’s team against illegal business in Dharur city. )
अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत ( Additional Superintendent of Police Pankaj Kumawat ) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका सुरु आहे. माजलगाव, परळी, केजनंतर कुमावत यांच्या पथकाने धारूर (Dharur) पोलिस ठाणे हद्दीत अवैध गुटखा विक्री करणारा, अवैध मटका, सोरट जुगार खेळणाऱ्या ठिकाणी छापेमारी केली. यात मटका घेणारा एक इसम ताब्यात घेऊन त्याच्याकडून कल्याण मटका जुगाराची साहित्य नगदी व मोबाईलसह 11 हजार 680 रुपयाचा माल जप्त केला. सोरठ खेळणाऱ्या दोन इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी 1340 रुपये सोरठ जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
यासोबत गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. गुटखा विक्री करताना एक इसम ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुटख्याचा माल व स्विफ्ट कार असा 3 लाख 76000 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. गुटख्याच्या गुन्ह्यात 4 आरोपी विरूद्ध व जुगाराच्या दोन गुन्ह्यात 4 आरोपी विरुध्द शुक्रवारी रात्री धारुर पोलिस ठाण्यात ( Police Station ) गुन्हे दाखल केले आहेत. सदरची कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुकुंद ढाकणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, पोलीस नाईक रामहरी भंडाने, संजय टूले यांनी केली.