Advertisement

बीड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शोभा भारत पिंगळे यांचे निधन.

प्रजापत्र | Friday, 02/09/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.2 सप्टेंबर – बीड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शोभा भारत पिंगळे यांचे आज शुक्रवारी (दि.2) दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी आसरडोह येथे अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
( Former president of Beed Zilla Parishad Shobha Bharat Pingle passed away. )

 

 

शोभा भारत पिंगळे या धारुर (Dharur) तालुक्यातील आसरडोह जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या होत्या. भाजप नेते रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांच्या कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. नंतर त्या बीड (Beed) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. उपचारादरम्यान आज शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6.30 वाजता आसरडोह येथील शेतात अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. एक शेतमजूर महिला ते जिल्हा परिषद अध्यक्षा (Zilla Parishad president) असा त्यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास आहे. त्यांच्या निधनाची बातमी आसरडोह गावात समजताच हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement

Advertisement