परळी वैजनाथ (प्रतीनिधी)-
परळी रोडवर आज सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान दोन करचा समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाला आहे. ह्या अपघातात दिंद्रूड पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे व त्यांचा ९ वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती असून पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे तसेच डाॅक्टर डाॅ.इलियास गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ सिरसाळा पोलीसांनी व नागरिकांनी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.दिंद्रूड येथून आलेली एम एच १४ ,जिवाय ९११३ , एस क्राॅस कंपनी ची पांढ-या रंगाची गाडी परळी कडे जात होती,जिच्या मध्ये दिंद्रूड पोलीस कर्मचारी होते.
परळी हून एम एच ४७ ,० ५३२६ काळवट रंगाची इंडीवर गाडी ज्यात परळी चे शासकीय डाॅक्टर डाॅ.इलियास असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात सिरसाळा येथील परळी रोडवरील प्रगती मंगल कार्यालया समोर घडला आहे. अपघात एवढा भिषण होता कि दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात एकमेकावर पडल्या आहेता.
कोमल शिंदे आपल्या मुलाला दवाखान्यात घेऊन जात होत्या : कोमल शिंदे ह्या दिंद्रूड पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा आजारी असल्याने त्यास उपचारा साठी दवाखान्यात घेऊन जात होत. सोबत गाडी चालक हा देखील पोलीस कर्मचारीच आहे त्यांचे नाव नवनाथ लटपटे आहे. अपघातातील पांढरी एस क्राॅस गाडी दिंद्रूड च्या सह पोलीस निरीक्षक पुंडकर यांची असल्याचे समजते आहे. कोमल शिंदे व त्यांचा मुलगा अति गंभीर झाल्याने त्यांचा या अपघातात मृत्यू झाला.