Advertisement

धारुरच्या तरुणाचा बसखाली येवून मुंबईत मृत्यू

प्रजापत्र | Tuesday, 30/08/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.30 अॉगस्ट - धारुरच्या तरुणाचा बसखाली येवून मुंबईत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. किशोर मसू लोखंडे (वय 44) असे मृत तरुणाचे नाव असून ते माजलगाव (Majalgoan) आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.

 

याबाबत मिळालेल्या माहितीवरुन सध्या गौरी गणपती निमित्ताने मुंबई येथे बीड (Beed) जिल्ह्यातील अनेक बसेस (ST Bus) वाहक व चालकासह राज्य परिवहन महामंडळाकडून पाठवण्यात आलेल्या आहेत. माजलगाव आगारातील वाहक किशोर मसू लोखंडे हे देखील कर्तव्य बजावण्यासाठी मुंबईला (Mumbai) गेले होते. मिळालेल्या माहितीनूसार सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंबई सेंट्रल येथील बस आगारात झोपलेले असताना त्यांच्या अंगावर बस चढून त्यांचा बसखाली चिरडून मृत्यू झाला. 

 

दरम्यान, किशोर लोखंडे यांच्या मृत्यूची बातमी धारुर (Dharur) शहरात येताच महामंडळ कर्मचारी व मित्र परिवारात शोककळा पसरली. लोखंडे हे धारुर शहरातील शिक्षक कॉलोनी येथील रहिवासी आहेत. त्यांचे पार्थिव मुंबईहून धारुरकडे आणण्यात येत असून त्यांच्या पार्थिवावर मुळगाव आवरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. लोखंडे यांच्या अकाली निधनामुळे माजलगाव व धारुर आगार कर्मचाऱ्यांत व गावात हळहळ व्यक्त होत आहे.

( Youth of Dharur dies in Mumbai after being hit by a bus; The carrier was in Majalgaon depot. )

Advertisement

Advertisement