Advertisement

स्फोट घडवण्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी पकडले!

प्रजापत्र | Sunday, 28/08/2022
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ (प्रतीनिधी):-औष्णिक विद्युत केंद्राच्या आधीपत्याखालील राखेच्या तलावात जिलेटिन कांड्यांचा स्पोट घडवून आणणच्या तयारीत असलेल्या तिघांना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. औष्णिक विद्युत केंद्राचे सुरक्षा अधिकारी अशोक प्रभाकर खाडे यांच्या फिर्यादीनुसार त्या तिघांवर स्पोटक पदार्थ अधिनियम 1908 नुसार गुन्हा दाखल करण्याला आला आहे.

 

 

याबाबत सविस्तर पोलीस सूत्रांकडून मिळालेली हकीकत अशी की, दि.26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेच्या तळ्यात काही इसम जिलेटिन कांड्यांचा स्पोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या आदेशाने पोलिसांच्या पथकाने त्या तिघांना अटक केली आहे.

 

 

मारोती कांचगुंडे रा. दाऊतपुर, हरिश्चंद्र तुकाराम जाधव, बालाजी लालु चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. आरोपींकडून वापरलेले हत्यार साहित्य इडी (जिलेटींग कांड्या) 103 प्रति नग 10 रूपये प्रमाने 1030 रूपये, तोटा 150 प्रति नग 10 रूपये प्रमाने 1500 रुपये, अर्धवट तुटलेले तोटे 14 अंकि. 70 रूपये,  ब्लास्टिंग बॅटरीची अं.कि. 500 रुपये व वायर अंदाजे 50 फुट, अं कि 150 रूपये असे एकुण 3250 रुपयाचा किमतीचा. माल जप्त करण्यात आला आहे.

 

 

आरोपीतांनी संगनमत करून औष्णीक विद्युत केंद्र परळी वै. हे मर्मस्थळ व अतिशय संवेदनशिल असतांना व येथे बहुसंख्य कामगार येत जात असतांना व हे माहीत असतांना देखील त्यांचे जीवीतास धोका निर्माण होईल असे स्फोटक पदार्थ आणुन राख पाईप मधुन जेथे पडते तिथे स्फोट घडवुन आणुन असे बेकायदेशिर कृत्य केले आहे म्हणून गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पौळ हे करत आहेत.
 

Advertisement

Advertisement