मुंबई : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार दहावी आणि बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा विचार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या सोमवारी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची पायरी चढता येईल.दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दहावी आणि बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खाली क्लिक करा
बातमी शेअर करा