Advertisement

बंधाऱ्यात पडून बैलाचा दुर्दैवी मृत्यु

प्रजापत्र | Friday, 26/08/2022
बातमी शेअर करा

वडवणी दि.२६(प्रतिनिधी ) - बंधारा शेजारी बैल धूत असताना अचानक बैल पाण्यात पडून दुदैवी मृत्यू झाला आहे.हि घटना मौजे पिंपरखेड येथे आज सकाळी 9 वाजता घडली .तर पोळा सणाच्या दिवशीचं  ही घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये दु:ख व्यक्त केलं जात आहे.

 

 

वडवणी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथील रहिवाशी असणारे ईश्‍वर काळे हे शेतकरी बैलाला धुण्यासाठी गांवा शेजारील बंधाऱ्यावर गेले असताना अचानक बैलाचा तोल जावून बांधऱ्याच्या पाण्यात पडून दुदैवी मृत्यू झाला आहे.हि घटना आज सकाळी 9 वा.घडली असून पोळाच्या सणा दिवशीच दुदैवी बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांमधून दु;ख व्यक्त केलं जात आहे.तर याच बंधाऱ्यावर गेल्या वर्षी याच ठिकाणी एकाच घरातील तिघांना जलसमाधी मिळाली होती.याच ठिकाणी पुन्हा आज पोळाच्या सणा दिवशी बैलाचा दुदैवी मृत्यू झाला असल्याने दु;ख व्यक्त केलं जात आहे.
 

Advertisement

Advertisement