Advertisement

एसपींच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड

प्रजापत्र | Friday, 26/08/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२६(प्रतिनिधी ) - बीड शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांचे पथक लक्ष देऊन आहे. गेल्या काही दिवसात या पथकाने ठिकठिकारी अवैध धंद्यांवर धाडी टाकल्या आहेत. बीड शहरातील बसस्टँडसमोर सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून 12 जुगार्‍यांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पथकप्रमुख विलास हजारे यांनी केली.

 

 

बीड बसस्थानकासमोरील बंजारा हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती एसपींचे पथकप्रमुख विलास हजारे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी काल सायंकाळी तेथे छापा मारला असता जुगार खेळताना बारा जुगारी मिळून आले. त्यांच्याकडून रोख 34 हजार 80 रुपये तर जुगाराचे साहित्य, मोबाईल असा एकूण 93 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेले जुगारी नितीन आसाराम धायगुडे (रा. पिंगळे गल्ली, बीड), शेख मनुबाई शेख सलमान (रा. इस्लामपुरा, पेठ बीड), लक्ष्मण अरुण गुरसाळी (रा. रामतीर्थ नगर, पेठ बीड) अशोक प्रभाकर काळे (रा. धांडे नगर, बीड), हनुमंत महादेव कोकाटे (रा. बलभीमनगर, बीड), अशोक नामदेव गायकवाड (रा. बहीरवाडी अयोध्यानगर, बीड), राजू विठ्ठल लोखंडे (रा. खंडेश्‍वरी), सोमेश्‍वर सयाजीराव ढेरे (रा. संभाजीनगर, बीड), अकबर खान अय्युब खान (रा. कबाड गल्ली, बीड), बाबासाहेब रानमारे (रा. ढेकणमोहा), अंकुश दामू तावरे (रा. शिरपूर ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेे पथकप्रमुख सपोनि. विलास हजारे, पो.नाईक शिवदास घोलप, पोलीस अमलदार किशोर गोरे, विनायक कडू, बालाजी बास्तेवाड, गणपत पवार यांनी केली.
 

Advertisement

Advertisement