Advertisement

राज्य महामार्गापेक्षा गल्लीतील रस्ता बरा

प्रजापत्र | Monday, 22/08/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२१ (प्रतिनिधी)-बीड-नगर राज्य महामार्गाची अवस्था सध्या एखाद्यात गल्लीतील रस्त्यापेक्षा अत्यंत वाईट झाली आहे. या रस्त्यावरून रोज शेकडो वाहनांची वर्दळ सुरु असताना या रस्त्यावरील हजारो खड्डे सध्या वाहनधारकांसाठी चिंतेचा विषय ठरू लागले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चऱ्हाट फाट्यापर्यंत या रस्त्याची ठिकठिकाणी चाळणी झाली असून याकडे ना आ. संदीप क्षीरसागरांचे लक्ष आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे.

 

 

                 राज्य महामार्ग कसा नसावा याचे आदर्श उदाहरण आहे बीड-नगर रस्ता.या रस्त्यासाठी कितीही निधी आला तरी तीन महिन्यात या रस्त्याची दुरावस्था पुन्हा 'जैसे थी' पाहायला मिळते.मागील काही दिवसांपासून तर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. पावसाळ्यात तर पाण्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधकारांचा या रस्त्यावर अपघात होत आहे.तर रोज प्रवास करावा लागणाऱ्या वाहनधारकांना कधी एकदाचे खड्डे बुजवले जातात याची चिंता लागली आहे.

 

 

हाच का आदर्श रस्ता...
मागील सात-आठ महिन्यापूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगर रोडचा रस्ता आदर्श रस्ता असेल,या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना यापुढे कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ असे आश्वासन दिले होते.मात्र अवघ्या तीन महिन्यानंतर या रस्त्यावरील खड्डे पुन्हा उघडे पडायला सुरुवात झाली.आजघडीला तर या रस्त्यावर वाहन चालविताना तर प्रचंड काळजी घ्यावी लागत आहे.रोज या रस्त्यावरून प्रवास करणारांची मनके खिळखिळे झाली असून या रस्त्याची दुरावस्था कधी संपणार हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

 

Advertisement

Advertisement