Advertisement

'मुंडेजी मेरे मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी'

प्रजापत्र | Saturday, 20/08/2022
बातमी शेअर करा

परळी : 'गोपीनाथ मुंडे मेरे सहयोगी एवं मित्र थे, लोकनेता के रूप में उनकी याद हमेशा आती रहेगी', अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी जाग्या केल्या. राज्यपाल कोश्यारी सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 

 

 

राज्यपाल कोश्यारी यांचे काल परळी शहरात आगमन झाले. चेमरी विश्रामगृहात राज्यपालांचा  काल रात्री मुक्काम होता. आज सकाळी लातूरकडे जातांना राज्यपाल कोश्यारी यांनी गोपीनाथ गडाला आवर्जून भेट दिली. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. एका लेकीने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्मारक उभा केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे हे काम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे, अशा भावना राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केल्या. तसेच "मुंडेजी मेरे सहयोगी और मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी", अशा शब्दांत त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राज्यपालांनी पुतळा आणि गड परिसराची पाहणी केली. त्यानंतर ते लातूरकडे रवाना झाले.

Advertisement

Advertisement