Advertisement

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत

प्रजापत्र | Monday, 29/04/2024
बातमी शेअर करा

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून २४ लाखाच्या मशीनची देणगी
शिर्डी येथील साईबाबांच्या दरबारात देशासह परदेशी भाविक साईंच्या चरणी साेने, नाणेसह काेट्यावधी रुपयांचे दान अर्पण करीत असते. आज एका भाविकाने साई संस्थानच्या रुग्णालयास डायलिसिस मशीन भेट देत रुग्णसेवेची अधिक संधी दिली आहे.  

 

गरीब आणि गरजू रुग्णांसाठी साईबाबा संस्थानचे रूग्णालय वरदान ठरलय. निशुल्क सेवा देणा-या साईनाथ रुग्णालयास साईभक्त अशोक गुप्ता यांनी तब्बल २४ लाखाचं डायलिसिस युनिट साईंच्या चरणी देणगी स्वरूपात दिलय.साईनाथ रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना डायलिसिस सुविधा आता मोफत मिळणार आहे. साईनाथ रुग्णालयात डायलिसिस मशीनची विधिवत पूजा करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी साई संस्थानचे मुख्य अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे, देणगीदार साईभक्त अशोक गुप्ता तसेच संस्थांनच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, भाविक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement