बीड - जबरदस्तीने कर्ज देऊन नंतर अल्पवयीन मुलीचे मॉर्फ केलेले बनावट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भामट्यांनी महिलेकडे अधिक रक्कमेसाठी तगादा लावला. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बीड शहरातील गृहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ८ ऑगस्ट रोजी त्यांच्या मोबाईलवर दोन मिनिटात कर देण्याचे आमिष दाखवणारी लिंक आली. त्या गृहिणीने ती लिंक उघडली आणि बंद केली. त्यानंतर त्यांच्या खात्यावर ४ हजार रुपये जमा झाले. मंगळवारी (दि.१६) त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून व्हाॅट्सॲप मेसेज आला. त्यात त्यांच्या मुलीचा आणि मुलाचा रक्षाबंधनाचा डीपी ठेवलेला फोटो होता. त्यानंतर लागलीच आलेल्या दुसऱ्याचा मेसेज मधून भामट्यांनी आमचे कर्ज तत्काळ परत करा अन्यथा तुमचे फोटोची जोडतोड करून ते बनावट अश्लील फोटो तुमच्या नातेवाईकामध्ये व्हायरल करूत अशी धमकी दिली. त्या गृहिणीने दोन दिवसात रक्कम परत करते असे सांगितले, तरीद्केहील भामट्यांनी तिच्या मुलीचा मॉर्फ फोटो पाठवला आणि रकमेची मागणी करत सतत कॉल करून त्रास देऊ लागले. अखेर त्रासलेल्या त्या गृहिणीने शिवाजीनगर ठाणे गाठून तक्रार नोंदवली. याप्रकरणी अज्ञात भामट्यांवर गुन्हा दाखल झाला.