Advertisement

कंटेनर - दुचाकीचा भीषण अपघात

प्रजापत्र | Sunday, 14/08/2022
बातमी शेअर करा

बीड दि-१४(प्रतिनिधी) -  कंटेनर - दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे . ही घटना मांजरसुंभा - पाटोदा महामार्गावर संध्याकाळी सहा च्या सुमारास घडली . 
 

 

दिनांक १४ ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता मांजरसुंभा ते पाटोदा राज्य महामार्ग क्रमांक ५४८ -डी वर सासवड फाट्यावर मोटारसायकल स्वार मुकींद पवार रा. हिंगणी हवेली तालुक्यातील.गेवराई जि.बीड हे पाटोदा येथुन होंडा मोटारसायकल (क्रमांक एमएच.एच.-४२ ए.डी.९६६५) गावी जात असताना ससेवाडी फाट्यावर कंटेनर (क्रमांक एम.एच.४६ बीड.बी.४६८)ड्रायव्हर सुनिल लक्ष्मण नाकाडे रा.जाटदेवळा ता.पाथर्डी जि.अहमदनगर मांजरसुंभाकडुन पाटोद्याकडे जात असताना अपघात होऊन अपघातात मुकींद पवार जागीच ठार झाले. नेकनुर पोलीस व मांजरसुंभा महामार्ग पोलीस प्रशासन यांनी स्थळ पंचनामा केला. 
 

Advertisement

Advertisement