Advertisement

केज व वडवणीच्या बंदमुळे धारुरकरांना धास्ती

प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-केज व वडवणी तालुक्यात प्रशासनाच्या वतीने बफर झोन निश्चित केल्यानंतर या दोन्ही शहरातील नागरिकांनी स्वंयस्फुर्तिने बंद पुकारल्याने धारुरकरांनी धास्ती घेतली असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दोन दिवसात केज व वडवणी तालुक्यात कोरोना रुग्ण सापडली आहेत. यामुळे प्रशासन सतर्क झाले असुन केज व वडवणी तालुक्यातील अनेक गावे बफर झोन म्हणून जाहिर करत अनिश्चित काळासाठी बंद केली आहेत. रुग्ण सापडल्याने केज व वडवणी मध्ये चांगलीच खळबळ माजली. या दोन्ही तालुक्यासह धारुरमध्येही  मुंबईहून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यात केज व वडवणीत रुग्ण सापडल्याने या दोन्ही शहरात स्वंयस्फुर्तिने २३ ते २७ संपुर्ण बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मात्र धारुर शहरात धास्ती पसरलेली पाहावयास मिळत आहे. अद्याप कोरोनामुक्त राहिलेल्या धारुर शहरातही याबाबत सतर्कता बाळगली जावी अशा चर्चा सोशल माध्यमातून होत आहेत. केज व वडवणी बंद असल्यास धारुर बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता नाकारली जावू शकत नाही. यामुळे प्रशासनातही चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Advertisement

Advertisement