बीड - घरात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती माजलगावचे डीवायएसपी यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपले पथक पाठवून त्याठिकाणी धाड टाकली असता तब्बल 97 हजाराचा गुटखा मिळून आला. तो गुटखा जप्त करत ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. ही कारवाई 9 ऑगस्ट रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगामसला येथे करण्यात आली.
जावेद गुलाब सय्यद, राहुल नागनाथ गडदे (दोघे रा. गंगामसला ता. माजलगाव) यांनी स्वत:च्या घरात गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती माजलगावचे डीवायएसपी यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी आपले पथक पाठवून त्याठिकाणी काल सायंकाळी सात वाजता छापा टाकला. या वेळी विविध कंपनीचा 97 हजार 100 रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी गुटखा ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केचला. या प्रकरणी पोलीस नाईक रविशंकरराव राठोड यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जावेद आणि राहुल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय दाभाडे हे करत आहेत.