Advertisement

बीडच्या सीएसपदी डॉ. सूर्यवंशी

प्रजापत्र | Friday, 05/08/2022
बातमी शेअर करा

बीड : बीडच्या रिक्त असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावर शासनाने डॉ. सतीश सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. ते लासलगाव येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. 
बीडचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. यापदाचा अतिरिक्त पदभार माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे होता. त्यांनी मागच्या वर्षभरात जिल्हा रुग्णालयात मोठे बदल केले. आता या पदावर लासलगाव जिल्हा नाशिक येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. सतीश सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

डॉ. साबळे यांची संस्मरणीय कारकीर्द    
बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार मागच्या एक वर्षापेक्षा अधिक काळापासून डॉ. सुरेश साबळे यांनी सांभाळला. कोरोनाच्या लाटेतून जिल्ह्याला सांभाळतानाच कोरोनामुळे विस्कळईत झालेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्याचे मोठे आव्हान त्यांनी पेलले. कोरोनामुळे स्थलांतरित कराव्या जिल्हा रुग्णालयाला पुन्हा मूळ जागी आणण्यापासून ते येथे अधिकाधिक वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत डॉ. साबळे यांनी अक्षरशः झोकून देऊन काम केले. जिल्हा रुग्णालयात अनेक नवनवीन उपचार त्यांनी सुरु केले. यात बंद असलेले डायलिसिस , हाडाच्या शस्त्रक्रिया , दुर्बिणीद्वारे मूळव्याध शस्त्रक्रिया यासह इतरही अनेक गंभीर आजारावरील उपचार त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्हा रुग्णालयात सुरु केले. जिल्हा रुग्णालयासोबतच जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयाने आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये त्यांनी मोठे बदल केले. सरकारी दवाखान्यात कॉर्पोरेट चेहरा देऊन ते अधिकाधिक रुग्णस्नेही व्हावे यासाठी  त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा रुग्णालयावरील सामान्यांचा विश्वास अधिकच वाढल्याचे चित्र होते. 

 

Advertisement

Advertisement